तळोजा एमआयडीसीतील आयजीपीएल कंपनीतर्फे तीन हजार झाडांची लागवड

प्रभात पर्व न्यूज - Published: 24-Jun-2019 08:07 am

तळोजा :  तळोजा एमआयडीसीतील आय. जी. पेट्रोकेमिकल्स या कंपनीतर्फे घोट, कोयनावेळे, नितळस तसेच परिसरात सुमारे तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी घोटगांव ते तळोजा फेज-२ या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. तसेच नितळस गावात जाणाऱ्या रस्त्यावर अशाप्रकारे दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक जे. के. साबू यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते या वृक्षारोपणाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
        तळोजा एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी बकुळ, निंब, गुलमोहर, वड, बांबू, कांचन, अशोका यांच्यासह एकूण १५ प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच कंपनीने या रोपांच्या संवर्धनाची सुद्धा जबाबदारी स्वीकारली असून यापुढेही अशाच प्रकारे वृक्षलागवड करून त्यांच्या संवर्धनासाठी जातीने लक्ष घातले जाईल, असे कंपनी व्यवस्थापकडून सांगण्यात आले आहे.
        तळोजा एमआयडीसीतील आयजीपीएल कंपनीच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनात भर पडण्यास मदत होणार असून इतर कंपन्यांनी सुद्धा याचा अवलंब करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नितळस गावच्या सरपंच सौ. सपना भोपी, सामाजिक कार्यकर्ते नंदू भोपी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वृक्षलागवडीसाठी उत्स्फूर्तपणे मदत करून कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement