तळोजा एमआयडीसीतील सर्वच कामगारांची कोरोना चाचणी अशक्य; कारखानदारांचे स्पष्टीकरण

प्रभात पर्व न्यूज - Published: 22-Jul-2020 06:56 pm

तळोजा: एमआयडीसीतील सर्व कारखानदारांनी आपापल्या कंपनीतील सर्व कामगारांची कोरोना टेस्ट करण्यात यावी तसेच तळोजा एमआयडीसी परिसरात कोरोना रूग्णांसाठी स्वखर्चाने आयसोलेशन सेंटर उभारण्यात यावे,  अशी सूचना पनवेल महापालिकेच्या वतीने कारखानदारांना करण्यात आली आहे. परंतु तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (TMA) आणि तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (TIA) या कारखानदारांच्या दोन्ही संघटनांनी याला विरोध केला आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या कामगारांची चाचणी केली जात असल्याचा दावा कारखानदारांनी केला असून लक्षणे नसताना सर्वच कामगारांची कोरोना चाचणी करणे, अशक्य असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याशिवाय, महापालिकेला मोठ्या प्रमाणात आम्ही टॅक्स दतो, त्यामुळे स्व:खर्चाने आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी आग्रह करणे, योग्य नसल्याचे स्पष्टीकरण कारखानदारांनी दिले आहे.

       तळोजा एमआयडीसी परिसरात काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखानदारांनी एमआयडीसीमध्ये कामगारांसाठी आयसोलेशन सेंटर उभारण्यात यावे, अशी सूचना केली होती. याशिवाय कारखानदारांनी आपल्या कंपनीतील सर्व कामगारांची कोरोना टेस्ट करावी, अशा आशयाचे पत्र  कारखानदारांची संघटना टिमए व टिआयए यांना देण्यात आले होते. याबाबत टिएमएच्या हॉलमध्ये आज बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखानदारांनी महापालिकेचे दोन्ही प्रस्ताव अमान्य केले आहेत. याबाबत संघटनेचे अध्यक्ष शेखर श्रृंगारे यांनी सांगितले की, गेले अनेक महिने लॉकडाऊन असल्याने ‌आगोदरच कारखानदार‌ मेटाकुटीला आले आहेत. आता कारखाने चालवनेच खऱ्या अर्थाने कठीण झाले आहेत. मागणी कमी झाली झाल्याने कारखान्यांतील उत्पादन प्रक्रिया थंडावली आहे. महापालिकेला मोठ्या प्रमाणात आम्ही टॅक्स दतो, त्यामुळे पालिकेने आमच्याकडे या गोष्टींसाठी आग्रह करणे बरोबर नाही. शिवाय ज्यांना लक्षणं नाही अशांची कोरोना टेस्ट करावी असे WHO आणि ICMR या दोन्ही आरोग्य संघटनांचे निर्देश नाही. खर तर, स्व:ता महापालिका देखिल आपल्या सर्व नागरीकांची टेस्ट करत नाही, मग आम्हाला असा आग्रह का करावा? असा सवाल उपस्थित केला आहे.

          याबाबत टिआयएचे अध्यक्ष सतिश शेट्टी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, आज एमआयडीसीतील काही ठराविक कारखानेच सुरू आहे. अनेक कारखाने सुरू करणे आवश्यक असून त्यासाठी महापालिका कुठलेही सहकार्य करीत नाही. त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, असे सांगितले जाते. महापालिकेला करोडो रुपये कर रूपाने कारखाने देत असतात. पण त्या बदल्यात ‌आम्हाला कोणत्याही सुविधा पुरविण्यात येत नाही. आता कारखाने सुरू ठेवणे कठीण झाले आहे. त्यातच कारखानदारांनी एक हजार खाटांचे आयसोलेशन सेंटर उभारण्याची मागणी महापालिका करत आहे, ती अतिशय चुकीची आहे. शिवाय सर्व कामगारांची टेस्ट करावी, असा आग्रह करणे देखिल बरोबर नाही. कारण सध्या सर्वसामान्य लोकांमध्ये कोणाचीही टेस्ट केली तरी ती कोरोना 'पॉझिटिव्ह' येत असल्याची‌ उपहासात्मक चर्चा सुरू असून एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. त्यातच एकदा टेस्ट केली म्हणजे परत कोरोना होणार नाही किंवा टेस्ट करावी लागणार नाही असेही नाही. ज्या ज्या कामगारांना कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आली आहेत, त्यांची ताबडतोब तपासणी करण्यात येते. शिवाय कारखान्यात सॅनिटायझेशन, सोशल डिस्टंस, मास्क वापरणे‌ हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement