तळोज्यातील कारखानदारांकडून १८ कोटी वसूल करण्याचे एमआयडीसी प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

प्रभात पर्व न्यूज - Published: 11-Nov-2019 11:04 am

तळोजा: सर्वोच्च न्यायालयाने तळोजा एमआयडीसीतील ३२४ कारखानदारांकडून १८ कोटी रुपये लवकरात लवकर वसूल करण्याचे आदेश एमआयडीसी प्रशासनाला आदेश दिले आहेत. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी धाव घेतली आहे. या याचिकेनंतर तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नवीन जादा क्षमतेचे सीईटीपी प्रकल्प उभारण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. रासायनिक कारखान्यांकडून १८ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश एमआयडीसीला देण्यात आले होते. मध्यंतरी तळोजा एमआयडीसीमधील ५० टक्के पाणीकपातीविरोधात कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने कारखानदारांना दिलासा देत पाणीकपात रद्द केली होती. मात्र, कारखानदारांनी एमआयडीसीकडे १८ कोटी रुपये भरले नाहीत. यासंदर्भात, तीन आठवड्याची मुदत देऊन सर्वोच्च न्यायालयाने १८ कोटी वसूल करण्याचे आदेश एमआयडीसी प्रशासनाला दिले आहेत.
        याबाबत तळोजा एमआयडीसीचे उपअभियंता दीपक बोबडे पाटील यांनी माहिती दिली की, ३२४ कारखानदारांपैकी काही कारखानदारांनी एमआयडीसीकडे पैशाचा भरणा केला आहे. ज्या कारखानदारांनी पैसे भरले नाहीत, अशा कारखानदारांना सोमवारपासून नोटीस बजावणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान, एमआयडीसीसोबत झालेल्या करारानुसार आम्ही पैसे भरण्यास तयार असून न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी हे पैसे भरणार असल्याची माहिती, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे (टी.आय.ए.) अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी दिली आहे.
        दरम्यान, प्रदूषणासंदर्भातील आपली याचिका प्रलंबित असली तरी, आपल्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement