मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसार फंडातून सिध्दी करवले, चिंध्रण गावांना भरघोस मदत

प्रभात पर्व न्यूज - Published: 04-Dec-2020 11:33 am

तळोजा : मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी वेळोवळी सीएसार फंडातून आजुबाजूच्या गावांमध्ये मदत कार्य करीत असते. नुकतेच कंपनीने सिध्दी करवले गावासाठी दोन आरओ प्लांट बसवून प्राथमिक शाळेची दुरुस्ती केली आहे. शिवाय महीलांसाठी २२ शिलाई मशीन देऊन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने चिंध्रण गावातील महिलांसाठी महीला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी ३० शिलाई मशीन देऊन कंपनीने प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नेमण्यात आला आहे.

      यावेळी सिध्दी करवले याठिकाणी ग्रामस्थांनी दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते आर ओ प्लान्टचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक तासाला एक हजार लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता आरओ मशीनची असल्याने संपूर्ण गावच्या शुद्ध पीण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता पारधी यांच्या हस्ते चिंध्रण येथील महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.

        "कंपनी सामाजिक बांधिलकी जपत वेळोवळी आजुबाजुला असणाऱ्या गावांसाठी मदत करत आहे. आमच्या सीएसार विभागाकडून गावांसाठी कोणकोणती मदत करता येईल याची पाहणी केली जात असते. ग्रामस्थांनी केलेली मागणी आणि सीएसआर विभागाकडून करण्यात आलेली पाहणी, या माहितीच्या आधारे कंपनी कोणती कशारीतीने मदत करता येईल हे ठरवून आवश्यक ते उपक्रम राबवत असते", अशी माहिती कंपनीचे प्रोजेक्ट हेड सोमनाथ मालगर यांनी दिली आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement