विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यावतीने खिडुकपाडा येथे रक्तदान शिबीर संपन्न

प्रभात पर्व न्यूज - Published: 29-Nov-2020 10:13 pm

कळंबोली : विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पनवेल यांच्या वतीने खिडुकपाडा गावात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. श्रीराम जन्मभूमी आंदोलनात हुतात्मा झालेल्या कारसेवकांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपूर्ण देशभरात या कालावधीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असून खिडुकपाडा येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले‌. यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यावेळी गुरुनाथ मुंबईकर यांना रोटरी क्लब खारघर यांच्या वतीने कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद कुलाबा जिल्ह्याचे मंत्री रमेश मोगरे, कुलाबा संयोजक साईनाथ श्रीखंडे, सुभाष कडव, महिंद्र पाटील यांच्यासह तळोजा, तोंडरे, कळंबोली, नावडे, कामोठे येथील पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित होते. 

            या शिबिराची व्यवस्था डी वाय पाटील हॉस्पिटल, नेरूळ यांच्यामार्फत डॉ. प्रसाद कुलकर्णी व राजेश पाटील यांनी केली होती. खिडुकपाडा ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी गुरुनाथ पाटील, विनोद पाटील, निलेश भोईर, राहुल उलवेकर, रोहिदास ठाकूर, सुनील वासकर, अमर उलवेकर, चेतन उलवेकर, सिमा उलवेकर, यमनप्पा मेहेगरी, सूरज भोईर, मधुकर गोंधळी,साई स्पोर्ट्स, गावदेवी मित्र मंडळ, वरदविनायक ग्रुप यांचेही विशेष योगदान लाभले.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement