पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ५० नवे रूग्ण; ५६ जण कोरानामुक्त
प्रभात पर्व न्यूज - Published: 29-Nov-2020 05:51 pmपनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आज (रविवार, २९ नोव्हेंबर) ५० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५४२४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २४१७७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६७० ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.