गुटखा विक्री करणारी आंतरराज्य टोळी गजाआड; पनवेल गुन्हे शाखेची धडक कारवाई

प्रभात पर्व न्यूज - Published: 28-Nov-2020 09:28 pm

पनवेल : परराज्यातून आणलेला गुटखा मुंबईत विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पनवेल गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने ६ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा गुटखा तसेच टेम्पो व लक्झरी बस जप्त केली आहे.

               महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना,इतर राज्यातुन चोरीच्या मार्गाने मुंबई शहरात गुटखा विक्री करणारी आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची माहिती पनवेल गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नवी मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. २७ नोव्हेंबर ) सकाळी ९ च्या सुमारास पनवेलमधील गार्डन हॉटेल समोरील रस्त्यावर सापळा लावला होता.

         यावेळी मुंबईच्या दिशेने जाणार टाटा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली असता, टेम्पोमध्ये ६ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा विमल, राजश्री या कंपनीचा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त करून टेम्पो चालक राज साळुंखेला टेम्पोसह ताब्यात घेतले. मध्यप्रदेशातील इंदोर येथून लक्झरी बसमधून हा गुटखा आणण्यात आल्याची माहिती पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथील रॉयलस्टार ट्रॅव्हर्स अँड टुर्सची लक्झरी बस जप्त करून बस चालक अशपाक कालु खा याला अटक केली.अशपाकची चौकशी केल्यावर गुटखा घेणाऱ्या इरशाद सैजुद्दीन अन्सारीला अटक करून त्यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

             या कारवाईत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले, संदीप गायकवाड, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक वैभव रोंगे, हवालदार सुनील साळुंखे, उत्तम तरकसे, मधुरकर गडगे, सचिन पवार, प्रमोद पाटील, तुकाराम सूर्यवंशी, सुनील कुदळे, चेतन जेजुरीकर, सचिन म्हात्रे, इंद्रजित कानू, प्रफुल्ल मोरे, राजेश बैकर, सचिन पाटील, अजिनाथ फुंदे, प्रवीण भोपी यांनी सहभाग घेतला.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement