पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १०२ नवे रूग्ण; एका मृत्यूची नोंद, ७५ जण कोरानामुक्त
प्रभात पर्व न्यूज - Published: 26-Nov-2020 06:36 pmपनवेल : पनवेल महापालिका हद्दीत आज (गुरूवार, २६ नोव्हेंबर) १०२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच नवीन पनवेल येथील एका मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २५१९० कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३९९१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५७७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६२२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.