वीजबिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी भाजपचे 'वीजबिल होळी' आंदोलन

प्रभात पर्व न्यूज - Published: 23-Nov-2020 03:35 pm

पनवेल : वीजबिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, दि. २३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले असून याचा एक भाग म्हणून पनवेलमध्ये सुध्दा वीजबिल होळी आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी 'वाढीव वीज बिल रद्द करा' अशी जोरदार मागणी करतानाच ठाकरे सरकारच्या कारभाविरोधात घोषणाबाजी झाली. यावेळी खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पनवेलमध्ये बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले.

                राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला असल्याचा आरोप भाजपने केला. कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. कोरोनामुळे नोकरी, धंदा, व्यवसायावर परिणाम झाले असताना मात्र राज्य सरकारने वीज वाढीव देयके देऊन ग्राहकांना वेठीस धरले असून सर्वसामान्य जनतेला यामधून दिलासा मिळावा, यासाठी भाजपाने राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन पुकारले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement