शेतकरी आणि कामगार कायद्यांविरोधात शेकापचा २६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रभात पर्व न्यूज - Published: 21-Nov-2020 03:42 pm

पनवेल : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या दिवशी पक्षाची ताकद दाखवित संपूर्ण पनवेल लालेलाल करण्याचे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात शेकापच्या पनवेल येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राजेंद्र पाटील, आरडी घरत, तालुका चिटणीस राजेश केणी, अनुराधा ठोकळ, प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

               आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट रचला असून तो कदापी यशस्वी होऊ देता कामा नये यासाठी केंद्र सरकार विरोधात, २६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयानक आहेत. सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. महत्त्वाचा भाग असणारे कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्याचा घाट देखील केंद्राने घातला आहे. या प्रश्‍नांप्रमाणेच निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान अजूनही भरुन देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचितच आहेत. झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे. छोट्या-मोठया उद्योगांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. या काळात आलेले भरमसाठ विजबील पूर्णपणे माफ केलेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पनवेलचे शेकापचे कार्यकर्ते लढवय्ये असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 

           शासनाने शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे त्या धोरणाला २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध दर्शविण्यात येणार आहे. शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्या विरोधात संपूर्ण देश पेटून उठला आहे. त्यासाठी पनवेल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाकडून कायद्यांमध्ये बदल केला जातोय. केंद्र शासन ३६० डीग्री मध्ये कायदे बदलायवला निघाला असल्याचा आरोप आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement