पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे १७ नवे रूग्ण; ६४ जण कोरोनामुक्त
प्रभात पर्व न्यूज - Published: 19-Nov-2020 06:24 pmपनवेल : पनवेल ग्रामीणमध्ये आज (गुरूवार, १९ नोव्हेंबर) १७ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून ६४ रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंतच्या एकूण ७२४० कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण ६८७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर १३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे २३५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.