कृष्णकुंजवर 'दीपारंभ' दिवाळी अंकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Nov-2020 04:47 pm

मुंबई : दिवाळी सणांमध्ये फराळा सोबतच वाचक वर्गाला उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची. रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) पहिल्या वहिल्या दीपरंभ या दिवाळी अंकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कृष्णकुंजवर करण्यात आले. दीपारंभाचे संपादक हर्षल भदाणे पाटील यांच्या अथक परिश्रमातून दिवाळी अंक आला आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी मनसेचे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे, अक्षय काशिद व त्याचबरोबर मनसेचे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. या दिवाळी अंकाची महत्त्वाची विशेष बाब म्हणजे १९ तारखेला होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनात सुद्धा हा अंक वाचकांना पाहायला मिळणार आहे.

    या दिवाळी अंकात अनेक मान्यवर लेखकांनी आपले लिखाण केलेले आहे. फार कमी वेळात वाचकांच्या पसंतीत दीपारंभ दिवाळी अंक उतरलेला आहे. एकीकडे कोरोनाचे सावट असल्याने अनेक दिवाळी अंक यंदा प्रसिद्ध झाले नाही तर दुसरीकडे दीपारंभाचे संपादक हर्षल भदाणे पाटील यांच्या अथक परिश्रमातून दिवाळी अंक आला आहे. या दिवाळी अंकासाठी सौरव महाजन, शुभम पेडामकर, शिवाली जाधव, अक्षय काशिद या संपूर्ण टीमने खूप हातभार लावून हा अंक यशस्वीरित्या संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवलेला आहे. तुम्हाला सुद्धा दीपारंभ दिवाळी अंक खरेदी करायचा असल्यास 9870993003 आणि 7972213844 या या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement